Home मनोरंजन ‘केजीएफ २’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला…!

‘केजीएफ २’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला…!

63
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : साऊथ चा रॉकिंग स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता यश चा ‘केजीएफ’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरला.त्यानंतर ‘केजीएफ’ च्या चॅप्टर २ साठीची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये दिसून आली.दरम्यान, ‘केजीएफ चॅप्टर २’चे टिझर प्रदर्शित झाले असून,या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि कुतूहल कायम असेल ही बाब आता स्पष्ट झाली आहे.

याअगोदर चित्रपटाचे टिझर अभिनेता यश च्या वाढदिवसाला प्रदर्शित होणार होते.मात्र,ठरलेल्या तारखेच्या एक दिवस अगोदरच चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.चाहत्यांमध्ये चित्रपटासाठीची असणारी उत्सुकता पाहता हा निर्णय़ घेण्यात आल्याचे म्हणण्यात येत आहे. टदरम्यान,टिझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तो काहीवेळातच ट्रेंडमध्ये आला.

चित्रपटाच्या टिझर मध्ये अभिनेत्री रवीना टंडन एक राजकीय व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे.मात्र,संजय दत्तच्या ‘अधीरा’च्या लूकवरुन मात्र अजूनही पडदा उचलण्यात आलेला नाही.अभिनेता यश यामध्ये जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. यशचा एकंदर लूक आणि अंदाज पाहता चाहते त्याच्यावर अत्यंत आकर्षित झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here