Home मनोरंजन ‘द गर्ल ऑन द ट्रेन’चा टीझर प्रदर्शित

‘द गर्ल ऑन द ट्रेन’चा टीझर प्रदर्शित

91
0

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्राचा खूप कालावधीनंतर “द गर्ल ऑन ट्रेन” हा चित्रपट येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.गेल्या वर्षी परिणीतीच्या ‘द गर्ल ऑन ट्रेन’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. तेव्हा पाहून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. २० सेकंदाच्या टीझरमध्ये परिणीतीचा वेगळा लुक उभारून येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता दिसून येत आहे.

यापूर्वी ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट ८ मे २०२० रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीतीच्या भूतकाळाचा भविष्यावर परिणाम होणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. टीझर प्रदर्शित होताच परिणीतीने चित्रपटातील एक पोस्टर देखील शेअर केले आहे. या चित्रपटात परिणीतीसोबत अदिती हैदरी, क्रिती कुल्हारी आणि अविनाष तिवारी देखील भूमिका साकारणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here