Home इतर शिक्षकानेच केली ७ वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या…!

शिक्षकानेच केली ७ वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या…!

83
0

मराठवाडा साथी न्यूज

वाराणसी : जौनपूर जिल्ह्यातील शाहगंजमध्ये आयटीआयचे शिक्षण घेत असणाऱ्या मुलांनी शनिवारी(२ जाने.)अभिषेक(वय )चे अपहरण करून हत्या केली. फक्त एव्हढेच नाही तर हत्येनंतर मुलाच्या वडिलांना फोन करून खंडणी देखील मागितली.

आरोपींनी ज्या नंबरवरून कॉल केला त्या नंबर संदर्भात संपूर्ण माहिती काढत पोलिसांनी आरोपींना शोधले.सुलतानपूर येथील शिवम श्रीवास्तव आणि बिहारच्या मोतिहारी येथील आकाशला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.चौकशीनंतर त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.त्यानंतर शिवम आणि आकाशने दिलेल्या माहितीनुसार घरापासून १२ किलोमीटरवर असलेल्या आयटीआय विद्यालयाच्या शेजारील पाण्याच्या टाकीजवळ मुलाचा मृतदेह सापडला.या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी १ जण हा मुलाची शिकवणी घेत होता.

नेमके काय घडले?

अभिषेक हा शनिवारी(२ जाने.)यादव कॉलनीत खासगी क्लासच्या शिक्षकाच्या घरी गेला.मात्र,दुपारी १२ वाजले तरी मुलगा परतला नाही.त्यामुळे त्याचे वडील दीपचंद हे शिक्षकाच्या घरी गेले. त्यावेळी अभिषेक हा शिकवणीसाठी आला नाही,असे शिक्षकाने सांगितले.त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास दीपचंद यांच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला तेव्हा त्यांना सात लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.त्यामुळे तत्काळ दीपचंद यांनीं शहागंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here