Marathwada Sathi

टॅक्सी-रिक्षा अडचणीत सापडल्या…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मुंबई, ठाण्यातील सीएनजी पंप चालकांनी जानेवारीपासून बेमुदत बंद पुकारलाय. त्याचा मोठा परिणाम वाहतुकीवर होणारेय. आधीच सर्वसामान्यांसाठी लोकल बंद आहेत.सीएनजी पंपचालकांनी बंद पुकारल्यामुळे मुंबई-ठाणेकरांचे टॅक्सी-रिक्षाच अडचणीत येणार आहे.युनायटेड सीएनजी डिलर्स असोसिएशननं पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.पंपासाठी स्वतःची जमीन आणि यंत्रणा उभारण्यासाठी पदरचे पैसे खर्ची घालणाऱ्या पंपचालकांवर नवी पॉलिसी जमिनीसह त्यांचा पंपच ताब्यात घेण्याचा महानगर गॅसचा डाव असल्याचा आरोप सीएनजी डिलर्स असोसिएशनं चा दावा आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरांत ४८ दिवस बदल झाले नव्हते. त्यानंतर २० नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ होण्यास सुरूवात झाली. सांगायचं झालं तर मार्चमध्ये पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात करण्यात आली. तेव्हा तेल कंपन्यांनी तब्बल ८२ दिवस दरांत कोणतेही बदल केले नव्हते. आज सलग २४ व्या दिवशी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ८३.८१ रूपये लिटर आहे. मुंबईमध्ये ग्राहकांना १ लिटर पेट्रोलसाठी ९०.३४ रूपये मोजावे लागत आहे.

Exit mobile version