Home मनोरंजन तापसीला मिळाले चक्क हे गिफ्ट…!

तापसीला मिळाले चक्क हे गिफ्ट…!

94
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सध्या अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या आगामी ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्थ आहे.या चित्रपटासाठी तापसी प्रचंड मेहनत करतांना दिसून येत आहे.चित्रपटाच्या सेटवरील तापसीचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.महत्वाचे म्हणजे तापसीची ही मेहनत बघून चित्रपटाचे निर्माते तिच्यावर फार खुश आहेत.त्यामुळे त्यांनी खास तापसीसाठी तिच्या आवडीचे गिफ्ट पाठवले आहे.याचा एक लहानसा व्हिडीओ तापसीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.

निर्मात्यांनी तिच्यसाठी खास दिल्लीतील छोले-भटुरे पाठविले आहेत.याचा व्हिडीओ शेअर करत,’आयुष्यातील सगळ्यात जास्त कष्ट केलेल्या दिवसांची पोचपावती म्हणून मला हे गिफ्ट मिळाले आहे’,असे कॅप्शन तिने दिले आहे.

दरम्यान, सध्या तापसी पन्नू ही झारखंडमध्ये ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्थ आहे.चित्रपटामध्ये ती एका अ‍ॅथलिटची भूमिका साकारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here