Home मनोरंजन अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा संशयास्पद ‘मृत्यू’…!

अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा संशयास्पद ‘मृत्यू’…!

872
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सुपरहिट चित्रपट ‘द डर्टी पिक्चर’ मध्ये विद्या बालन, इमरान हाशमी, नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत काम केलेली अभिनेत्री आर्या बैनर्जीचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकात्यातील जोधपूर पार्क स्थित घरात आढळला आहे.तिच्या इथे घरकाम करणाऱ्याने दार ठोठावूनही आतून काही उत्तर न आल्याने त्याने शेजाऱ्यांना बोलावले .बऱ्याच वेळापासून आर्या घरात बंद असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी दार उघडताच आर्या तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली. तिच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलीस तपास घेत आहेत.

अभिनेत्री आर्या बॅनर्जी विषयी थोडक्यात

आर्याने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली सोबतच तिने शास्त्रीय संगीतामध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेतली होती.२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.आर्या सुप्रसिद्ध सितारवादक निखिल बॅनर्जी यांची मुलगी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here