Home राजकीय सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला पुन्हा एक ‘दणका’…!

सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला पुन्हा एक ‘दणका’…!

721
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला पुन्हा एक दणका दिला आहे.सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास नकार दिला आहे.फक्त एव्हढेच नाही तर मराठा आरक्षणाला कोर्टाने अंतरिम स्थागिती दिल्यामुळे स्थगितीपूर्वीची नोकर भरती देखील लांबली आहे.

दरम्यान,मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा परिणाम सरकारी नोकरभरतीवर होत असल्याचे मराठा आरक्षण याचिकाकर्त्यांनी सांगितल्यावर आम्ही राज्य सरकारला नियुक्या करण्यापासून थांबवलेले नाही,असे देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र,नियुक्त्या करताना या कायद्यात करु नये असे कोर्टाने सांगितले आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली होती.त्यांच्यासमोर आज सुनावणी झाली. अजूनही सुनावणी सुरु असून वकील आपले युक्तिवाद खंडपीठासमोर करीत आहेत.

दरम्यान,जानेवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात यावर निर्णय घेण्यात येईल.असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here