Marathwada Sathi

सुनील शेट्टीचा नवा अंदाज

सुनील शेट्टी सोबतच ईशा देओल, राहुल देव, बरखा बिश्त आणि करणवीर शर्मा महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसतील. या साहसी-थरारक ट्रेलर यामधील वास्तववादी, प्रभावशाली आणि थक्क करणारी साहस दृश्यं यात पाहायला मिळतील. प्रिन्स धीमन आणि आलोक बत्रा यांचे दिग्दर्शन असलेली ही सीरिज सारेगामा इंडिया लिमिटेड’चा सिने विभाग, योडले फिल्म्सची निर्मिती असून तिचा प्रीमियर अॅमेझॉन मिनी टीव्हीवर २२ मार्चला होणार आहे.
कुटुंबाच्या भूतकाळातील घटनांनी ट्रेलरची सुरुवात होते, हा ट्रेलर थेट एसीपी विक्रमच्या जगात प्रवेश करतो. त्याला खोट्या गुन्ह्यात अडविण्याचा प्रयत्न आहे, एक जुनी भानगड झटकून स्वत:चा रस्ता साफ करण्याची नामी संधी त्याच्याकडे आहे. ट्रेलरमधून पोलिसाची देहबोली, दणकटपणा आणि वर्तन चपखल दिसून येते. त्याचे रांगडेपण आणि शेवटपर्यंत लढण्याची वृत्ती अधोरेखित होते. हा पोलीस म्हणजे जणू वन मॅन आर्मी! हा ट्रेलर आपल्या प्रेक्षकांना मजबूत साहसी प्रसंगातून सिने प्रवासाची सैर घडवून आणेल. या ट्रेलरला गुन्ह्याची काळी किनार लाभलेली आहे, गुपित खोलवर असून कथेची भिस्त सत्यावर आहे.
सगळ्या व्यक्तिरेखा विचारपूर्वक आणि सुंदर पद्धतीने शब्दबद्ध करण्यात आल्या असून माझे पात्र हे चपळ बुद्धी असलेले आहे, त्यांचे स्वत:चे असे रूल-बुक आहे आणि त्याला स्वत:चे नियम पाळायला आवडतात. या कार्यक्रमाच्या कथानकाला पकड आहे, त्यातील व्यक्तिरेखा नेहमीच्या असल्या तरीही एक ‘ट्विस्ट’ आहे, असं राहुल देव सांगतो.


ईशा देओल म्हणाली, वेळ कशी झटपट निघून जाते. आम्ही सगळे या दिवसाची वाट पाहत होतो, आणि हा दिवस उगवला. मी खूप उत्सुक होते की ट्रेलर प्रसिद्ध झाला, प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्याची घाई आम्हाला होती. मी तर झटपट होकार कळवला होता, कारण कथानकाचा अंदाज लावणे कठीण होते, दुसरी गोष्ट म्हणजे त्यातील पात्रं इतकी वेगळी तरीही पटकन आवडणारी आहेत. प्रेक्षकांना पाहताना नक्कीच मजा येणार आहे.

Exit mobile version