Marathwada Sathi

बीडमध्ये तरुणाची आत्महत्या

बीड : शहरातील अंकुशनगर भागातील एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. सदरील तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
बिभिशन नामदेव कोवरे या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तरुणाने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही.

Exit mobile version