Home औरंगाबाद हाॅटेलमध्ये तलाठ्याची ‘आत्महत्या’…!

हाॅटेलमध्ये तलाठ्याची ‘आत्महत्या’…!

116
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : सिल्लोड शहराबाहेरील असलेल्या ‘पूजा हॉटेल’ येथे तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार (ता.१६) रोजी संध्याकाळी वाजेच्या सुमारास घडली.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देऊळगाव(ता.भोकरदन)सजेवर कार्यरत असलेले तलाठी दिनेश माणिकलाल जैस्वाल (वय ४३,रा.सिल्लोड,औ.बाद) यांनी शहराजवळ असलेल्या ‘पूजा हॉटेल’ येथील तिसऱ्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here