Marathwada Sathi

अचानक मुलाच्या अंगावर बिबट्याने झेप घेऊन केले जखमी!

अहमदनगर
 संगमनेर ते कोल्हेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मोटर सायकलस्वरांवर झेप घेऊन ओम फकीरा मंडेला (वय १३ रा. वडाळा, नाशिक) या शाळकरी मुलाच्या पायाला तळपायाला आणि मांडीला चावा घेत गंभीररित्या जखमी केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
या बाबत समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील सूर्यकांत जेडगुले हे आणि त्यांच्याकडे पाहुणा म्हणून आलेला तरुण ओमफकेरा मंडेला रा नाशिक हे दोघेजण मोटरसायकलवर वांगी घेऊन संगमनेरला कोल्हेवाडी ते संगमनेर रोड ने संगमनेरला वांगी विकण्यासाठी जात होते.
यावेळी अचानक उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने त्यांच्या मोटरसायकलवर हल्ला चढविला असता तेदोघेही खाली पडले असता व बिबट्याने रवी मंडले याच्या पायाला चावा घेत त्यास गंभीररीत्या जखमी केले.

Exit mobile version