Home आरोग्य अजबच ! कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक ! अंगाला चिकटू लागल्या...

अजबच ! कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक ! अंगाला चिकटू लागल्या वस्तू

11492
0

नाशिक : कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर नाशिक येथील एका जेष्ठाच्या अंगाला चक्क लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचा अजबच प्रकार समोर आला आहे. सिडको भागातील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा अजब प्रकार घडला असून त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना देखील धक्का बसला आहे. अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी सपत्नीक कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला आहे. कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवर काल रात्री त्यांच्या मुलाने बघितले. हे पाहून त्याने सहज आपल्या आई वडिलांची चाचणी घेतली. तेव्हा आईला असे काही झाले नाही. मात्र वडिलांच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्या. त्यामुळे कुटुंबीय, शेजाऱ्यांसह डॉक्टरही चकित झाले. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवीन बाजी यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी तेथे भेट दिली आहे. त्यांनी हा चमत्कार नसून विज्ञानाचाच एक भाग असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाची वैद्यकीय चाचणी करून निराकरण करता येईल असे स्पष्ट केले आहे.

https://fb.watch/61CWwjiXAB/

लसीचा संबंध लावणे योग्य नाही – डॉ. तात्याराव लहाने
लसीचा आणि शरीराला स्टीलच्या वस्तू चिकटण्याचा काहीही संबंध नाही. असे राज्याच्या कोविड-19 कृतीदलाचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या शरीराला स्टील चिकटत असले तरी त्याचा आणि लसीचा कोणताही संबंध नसून या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये. त्यांच्या शरीराला स्टील तसंच लोखंड चिकटते. त्याच्या त्वचेला काहीतरी असावे त्यासाठी नाशिकमध्ये त्यांची तपासणी केली पाहिजे. मात्र, लसीचा संबंध लावणे योग्य नाही. कारण लसीमुळे असे काही घडत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here