Home क्राइम लोकशाहीचा अंत : बीड ग्रामपंचायतीचा अजब ठराव

लोकशाहीचा अंत : बीड ग्रामपंचायतीचा अजब ठराव

139
0


बलात्कार पीडितेला गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेत ठराव मंजूर – माणुसकीला काळिमा ,महिलेच्या मुलीवरही नराधमांचा अत्याचार

बीड : बीड जिल्ह्यातल्या गेवराईमधल्या पाचेगावमध्ये अजब प्रकार घडला आहे. बलात्कार पीडितेला गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे. अजब म्हणजे या ठरावावर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तबही केले आहे.या घटनेमुळे लोकशाही चा अंत येथेच झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.

दरम्यान, गावकऱ्यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडेही या महिलेला गावबंदी करावी यासाठी निवेदन दिले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या संतापजनक प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात काय चालले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

पाच वर्षांपूर्वी या महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा देण्यात आली. मात्र त्यानंतर या पीडित महिलेच्या मुलीवरही अत्याचार करण्यात आला. आणि हे प्रकरण दाबण्यासाठीच आपल्यावर गाव सोडण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here