Marathwada Sathi

तुफान थंडी : दल तलाव गोठला

काश्मीर : सध्या काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी होत आहे. यामुळे येथील पर्यटकांचे आकर्षण असणारा दाल तलावही गोठून गेला आहे. गेल्या २९ वर्षांतील हि सर्वात मोठी बर्फवृष्टी मानली जात आहे. सध्या श्रीनगरमध्ये तापमान उणे 8 अंशांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे येथील दृश्य खूप मनोहारी झाले आहे. पण यासोबतच तेथील जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे.

दाल तलाव गोठल्याने त्यावर उभा राहता येईल अशी येथील अवस्था सध्या झाली आहे.. श्रीनगरमध्ये कमीतकमी तापमान झाल्याने याठिकाणी पाणीपुरवठा करणारे पाईप्सही गोठले आहेत. शहरात आणि काश्मीर खोऱ्यात इतरत्र अनेक ठिकाणी रस्त्यावर बर्फाचा थर जमा झाला आहे. त्यामुळे वाहन चालकांना रहदारीसाठी देखील समस्या येत आहे.

Exit mobile version