परळी
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते हाळमचे भूमिपुत्र माधव मुंडे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दि.01 जानेवारी रोजी ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी महेश गित्ते संचलित स्वरनाथ ग्रुप, अंबाजोगाई यांचा बहारदार गितांची मैफल संपन्न झाली. गावातील व पंचक्रोशीतील जवळपास 2 हजार लोकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
तब्बल 2 महिन्यांपासून माधव मुंडे गुरुजी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्याची तयारी सुरू होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस गावातील माता-भगिनींनी आरती ओवाळून औक्षण केले. तदनंतर ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात आला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थिती होती. बराच वेळ चाललेल्या संगीत रजनी कार्यक्रमाचा उपस्थित सर्वांनी भरभरून आनंद घेतला. कार्यक्रम ऐन भरात आणि रंगात आल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांनी कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. अंधाराचा फायदा घेऊन दोनचार दगड कार्यक्रमाच्या दिशेने भिरकवण्यात आले. यातच काही नागरिक किरकोळ जखमीही झाले असून या घटनेची नोंद परळी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
गुरुजी एक उभारत नेतृत्व!
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते हाळमचे भूमिपुत्र माधव मुंडे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो हितचिंतकांची उपस्थिती होती. माधव मुंडे हे उभारते नेतृत्व असून ते सर्वंकष व्यक्तिमत्त्व आहेत. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला असून तरुणांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.