Marathwada Sathi

औरंगाबादेत उभारणार वामनदादा कर्डक यांचा पुतळा

स्वातंत्र्यसेनानी वामनदादा कर्डक यांच्या कार्याची व विचारांची जनतेला जाणीव व्हावी या हेतूने लवकरच औरंगाबादेत त्यांचा पुतळा बसवणार असल्याची माहिती महापालिकेकडून मिळाली आहे.

औरंगाबाद: आंमखास मैदानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात महाकवी वामनदादा कारक यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या कामासाठी ३० लाख ९६ हजार रूपये खर्च होणार आह. यासाठीच निविदा काढण्यात आला आहे.

नागरिकांनी सुद्धा पुतळा बसवण्याची मागणी प्रशासनाला केली होती. वामनदादा कर्डक यांनी ७० वर्ष आपल्या बुलंद लेखणीच्या आणि गीतांच्या माध्यमातून फुले , शाहू, आंबेडकर याचे विचार सोप्या भाषेतून जनसामान्यांपर्यंत पोहचवले. आता या पुतळा बसवण्याच्या अंदाजपत्रकास मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंजुरी दिली आहे.

Exit mobile version