Home मुंबई राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीत संपाचा इशारा

राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीत संपाचा इशारा

बोनस न दिल्याने संतप्त भूमिका

552
0

मुंबई : प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास 14 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा संघटनांनी व्यवस्थापणानी दिला आहे.
कोरोना महामारीमध्ये यासोबतच पूरपरिस्थितीमध्ये राज्यातील वीज कामगारांनी जीव धोक्यात घालून कार्य केले आहे. मात्र व्यवस्थापनाकडून कामगारांना दिवाळी बोनस दिलेला नाही. याचा निषेध म्हणून राज्यातील सर्व वीज कामगार, अधिकारी 14 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक दिवसाचा संप करणार असल्याचा इशारा तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघटनेकडून देण्यात आला आहे.

महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन वीज कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार, अभियंते, अधिकारी, सहाय्यक संघटनांनी बोनस देण्याच्या मागणीसंदर्भात हा इशारा दिला. तिन्ही प्रशासनांनी बोनस व पगारवाढीचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय न घेतल्याने सर्व संघटना आज राज्यव्यापी निदर्शने करणार आहे. यासोबतच लवकरात लवकर निर्णय जाहीर केला नाही तर राज्यातील 86 हजार वीज कामगार 14 नोव्हेंबरला संपावर जातील असा इशारा संघटनांकडून देण्यात आला.

वीज कंपन्यांमध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दरवर्षी बोनस दिला जात असतो. मात्र यावेळी त्यांना बोनस देण्यात आलेला नाही. यामुळे सर्व संघटनांकडून एकत्र येत संबंधित व्यवस्थापनाच्या प्रमुखांना बोनस आणि पगारवाढीचा दुसरा हप्ता देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र कोणत्याच कंपनीने कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे सर्व संघटनांची एकत्रित बैठक 10 नोव्हेंबर रोजी पार पडली. या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे दिवाळीपूर्वी बोनसची घोषणा न केल्यास पहिले निदर्शने करण्याचा आणि त्यानंतरही प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास 14 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा संघटनांनी व्यवस्थापणानी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here