Marathwada Sathi

वेश्याव्यवसायातील महिलांना राज्य शासनाचा मोठा दिलासा…!

मराठवाडा साथी न्यूज

वेश्याव्यवसायातील महिलांना राज्य शासनाचा मोठा दिलासा दिला आहे.कोरोना च्या प्रादुर्भाव काळामध्ये आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे.ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान दरमहा ५ हजारांची मदत वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना मिळणार आहे.त्यानुसार वेश्या व्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा ५ हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त २ हजार ५०० रुपये अर्थसहाय्य कोणत्याहे ओळखपत्र न मागता देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत ऑक्टोबर ते डिसेंबर या ३ महिन्याच्या कालावधीसाठी ५१ कोटी १८ लाख ९७ हजार ५०० रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपलब्ध करुन देण्याबाबतचा शासन निर्णय काल(२६ नोव्हें.) जारी करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयात दाखल फौजदारी अपिल क्र.१३५/२०१० या प्रकरणामध्ये वेश्या व्यवसायात कार्यरत महिला व त्यांच्या मुलांना कोविड कालावधीमध्ये अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याबाबत दि.२१ सप्टेंबर आणि दि. २८ऑक्टोबर,२०२० रोजीच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यात तात्काळ कार्यवाही होण्यासाठी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यंत्रणेला संवेदनशीलरित्या गतीमान कार्यवाहीचे निर्देश दिले होते.काल(२६ नोव्हें.)त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Exit mobile version