Marathwada Sathi

शाळा सुरु करणे बंधनकारक नाही…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पण यावेळी शाळा सुरू करणे बंधनकारक नाही, अशी भूमिका राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे की, येत्या सोमवारपासून म्हणजेच २३ नोव्हें. पासून राज्यात शाळा सुरू करण्यात येत आहेत.मात्र,शाळा सुरू करणे बंधनकारक नाही.राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून स्थानिक पातळीवर कोरोनाची काय परिस्थिती आहे, हे ठरवून निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पालकांच्या परवानगी देखील गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे,असेही बंधन नसणार आहे. शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच नुकसान होणार नाही. शाळेत विद्यार्थी आले नाही तरी त्याचा त्यांना उपस्थिती गुणांवर परिणाम होणार नाही, असेही वर्ष गायकवाड यांनी बोलतांना स्पष्ट केले.

Exit mobile version