Marathwada Sathi

संपात फूट; कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संघटनेची माघार, आजपासून कामावर रुजू

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सध्या राज्यातले शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्या राज्यातल्या शासकीय कामकाजाचा खोळंबा झाला आहे. मात्र आता या संपात फूट पडल्याचं दिसून येत आहे.

महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेतली आहे. या फेडरेशनने याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कळवलं आहे. या संघटनेने १४ आणि १५ मार्च रोजी संपात आपला सहभाग नोंदवला होता.

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आपली फोनवरुन चर्चा झाली आहे आणि फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी वेळ देण्याचं त्यांनी ठरवलं असून तोडगा काढण्याचंही आश्वासन दिलं. त्यानुसार, राज्यातल्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. म्हणून आजपासून प्रत्यक्ष काम बंद न करता काळ्या फिती बांधून काम सुरू राहील, असं फेडरेशनने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

या आधी ठाणे आणि सोलापूरच्या कर्मचारी संघटनांनीही संपातून माघार घेतली आहे.

Exit mobile version