Marathwada Sathi

ऑस्कर सोहळ्याचे खास क्षण…:‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर दीपिका पदुकोण भावूक

चित्रपटसृष्टीतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 95 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यंदाच्या सोहळा भारतासाठी खूप खास ठरला. ऑस्कर 2023 साठी ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळाले होते. हा पुरस्कार आरआरआरने आपल्या नावावर केला आहे. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून पुरस्कार मिळाला आहे. भारताला पहिल्यांदाच नाटू नाटूमुळे या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे. या सोहळ्यात अनेक संस्मरणीय क्षण पाहायला मिळाले. नाटू नाटूला ऑस्कर जाहीर झाल्यानंतर दीपिका पदुकोण भावूक झालेली दिसली. तिचे डोळे पाणावले होते. तर आरआरआरचे दिग्दर्शक राजामौली थिएटरमध्ये सर्वात मागे बसलेले दिसले.द एलिफंट व्हिस्पर्स हा सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट ठरला. तर ऑल दॅट ब्रीथ्स ही डॉक्युमेंटरी फीचर फिल्म या शर्यतीतून बाहेर पडली आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला या तीन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते.

पुरस्कार सोहळा सुरू होण्यापूर्वी दीपिका पदुकोणने रामचरण तेजासोबत फोटोशूट. आरआरआरच्या गाण्याच्या परफॉर्मन्ससाठी दीपिका येथे प्रेझेंटर म्हणून उपस्थित होती.

लॉस एंजेलिसमधील ऑस्कर सोहळ्यात RRR चे लीड स्टार कास्ट रामचरण तेजा आणि ज्युनियर एनटीआर
गुनीत मोंगा निर्मित द एलिफंट व्हिस्पर्सने सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटाचा ऑस्कर जिंकला. 
Exit mobile version