Marathwada Sathi

…… बोलते तुमच्याशी ,”गोदावरी ” चा टीजर आऊट

मुंबई : ‘तुम्हाला ऐकू येत असेल तर नदी बोलते तुमच्याशी.. गोदावरी.. पहिली झलक’, असं म्हणत अभिनेता जितेंद्र जोशीने आपल्या आगामी “गोदावरी ” चित्रपटाचा टीजर आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या चित्रपटात जितेंद्रसह नीना कुळकर्णी, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे, सखी गोखले, विक्रम गोखले आणि संजय मोने यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल महाजन करणार आहेत.

शाळा,काकण ,दुनियादारी या चित्रपटांत दमदार भूमिका करून जितेंद्र जोशीने मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचा आगामी “गोदावरी” या चित्रपटाबाबत तो खूप उत्सही असल्याचे त्याने म्हटले आहे.अभिनेत्यासोबतच तो एक उत्तम लेखकही आहे. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तो आपल्या कविता पोस्ट करत असतो .येत्या १ मे रोजी त्याचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/CJh74mcnY9L/?utm_source=ig_web_button_share_sheet

Exit mobile version