Marathwada Sathi

छावणी स्वीकृत सदयसाची लवकरच निवड ?

चार महिन्यापासून इच्छुकांचे देव पाण्यात

औरंगाबाद : छावणीतील स्वीकृत सदयसाची पुढील आठवड्यात निवड होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या जागेसाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छावणी परिषद (AURANGABAD CANTONMENT BOARD) ही 10 फेब्रुवारी रोजी बरखास्त होऊन प्रशासकांच्या हाती कारभार गेला आहे. त्यामुळे आता परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर आनंद, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्यासह एका स्वीकृत सद्यस्य ज्याची निवड होईल ते पहातील. मात्र प्रशासक लागून चार महिने उलटले आहेत. तरी अद्याप स्वीकृत सदयसाची निवड करण्यात आलेले नाही. एका जागेसाठी माजी नगरसेवक किशोर कछवाह, अनिल जैस्वाल, पदमश्री जैस्वाल, करणसिंग काकास, प्रतिभा काकास, संजय गारोल, प्रशांत तारगे, अय्युब लाला यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज केले आहे. मात्र यापैकी अध्यक्ष आनंद यांनी पदमश्री जैस्वाल, प्रतिभा काकास आणि प्रशांत तारगे यांची नावे स्वरक्षणं मंत्रालयाकडे पाठविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे इतर इच्छुक नाराजी व्यक्त करत आहेत. या तिघांपैकी एकाची पुढील आठवड्यात निवड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता कोणची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिघांनी आपआपल्या परीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. तरी तिघांही कोणाची निवड होते, ही धाकधूक लागल्याचे दिसत आहे.

येथे सर्व कायदा परिषदेचा
छावणी परिषदेचा कारभार हा त्यांच्या कायद्यानुसार चालतो, त्यामुळे सर्व निर्णय त्यानुसार होत असतात. आता स्वीकृत सदयसाची निवड ही स्वरक्षणं मंत्रालय करणार आहे. यासाठी परिषदेचे अध्यक्ष हे फक्त नाव सुचवितात. त्यांनी तीन नावे पाठविली आहेत, त्यापैकी एकाची निवड होईल, असे सामाजिक कार्यकतें मयंक पांडे यांनी सांगितले.

Exit mobile version