Marathwada Sathi

…म्हणून मी गंभीर शब्द वापरला होता !

धनंजय मुंडेंबाबत केले होते शरद पवार यांनी विधान

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप महिलेने लावला आहे,यामुळे सध्या ते चांगलेच अडकले आहेत. दरम्यान त्यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरू लागली होती.दरम्यान गुरुवारी केलेल्या वक्तव्यासंबंधी शरद पवार यांनी आपली बाजू मंडळी आहे. ते म्हणाले की, “काल बोललो तेव्हा हे सर्व मला माहिती नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार करणं याची नोंद गांभीर्याने घेतली पाहिजे या भावनेने मी गंभीर शब्द वारपरुन भूमिका घेतली. आता अधिक खोलात जाऊन वास्तव पुढे आणण्याची गरज आहे. कोणत्याही निर्णयावर येणं हा एखाद्यावर अन्याय करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही तपासातून येणाऱ्या निष्कर्षाची वाट पाहत आहोत”.

“आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या सदर्भात अजून तक्रार समोर आल्यानंतर याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. पोलीस योग्य काम करतील असा विश्वास आहे. पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, पण आम्ही तपासात एसीपी दर्जाची माहिला अधिकारी असावी असं सुचवलं आहे. पोलिसांनी सर्वांशी चर्चा करुन वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करावा,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.“आरोप करणाऱ्यावर एकाहून अधिक आरोप झाले त्याबाबतही सत्यता जाणून घेण्याची गरज आहे. आरोप झाला म्हणून सत्तेपासून दूर व्हा असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्ण शाहनिशा करुन पुढची पावलं टाकणार आहोत,” असं सांगत शरद पवार यांनी धनंजय मुंडे पदावर कायम राहतील असं सूचक विधान केलं.

“ज्यांच्या हातातून सत्ता गेली आहे त्यांची अस्वस्थता समजू शकतो. ती गेल्यामुळे नाराजी असणार. त्यासाठी ज्यांनी हे सगळं काम केलं असेल त्यांना टार्गेट करुन त्यांना ठोकण्याचं काम करणं हे फारसं वेगळं समजत नाही. हे राजकारणात आक्रमपणे आरोप करणं आणि भूमिका घेण्याचा भाग आहे,” असा टोला शरद पवारांनी भाजपाला लगावला.

Exit mobile version