सिडनी टेस्टमध्ये क्रीजवर ऋषभ पंत चा मार्क पुसून टाकताना स्टीव्ह स्मिथ दिसला होता.
सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा वादात सापडला आहे. सिडनी टेस्टमध्ये क्रीजवर ऋषभ पंत चा मार्क पुसून टाकताना स्टीव्ह स्मिथ दिसला होता.२०१७ मध्ये खेळपट्टीशी छेडछाड केल्याप्रकरणी स्मिथवर २ वर्ष बंदी घालण्यात आली होती.त्यामुळे स्मिथने परत एकदा खेळपट्टीशी छेडछाड तर नाही केली ,अशी चर्चा रंगात आहे. दरम्यान यावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने स्मिथचा बचाव केला आहे. मैदानात शॅडो बॅटिंग करण्याची स्मिथची सवय आहे, तो पंतचा गार्ड बदलण्याचा प्रयत्न करत नव्हता, असं पेन म्हणाला.
चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंतच्या जोडीने ऑस्ट्रेलियाला घाम फोडला होता. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी 148 रनची पार्टनरशीप केली. ऋषभ पंत खेळत असताना तर भारत ही टेस्ट जिंकेल असं वाटत होतं. त्यावेळी स्मिथने पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात क्रीजवरचा मार्क हटवत असताना दिसला.’स्मिथला टेस्ट क्रिकेट खेळताना तुम्ही बघितलं असेल, तर तो प्रत्येक मॅचमध्ये पाच-सहावेळा असं करतो. तो अनेकवेळा खेळपट्टीवर शॅडो बॅटिंग करतो, त्याने पंतचा गार्ड बदलण्याचा प्रयत्न केला नाही. तो जेव्हा मैदानात असतो, तेव्हा क्रीजवर जाऊन बॅटिंगची कल्पना करतो, तेव्हाही त्याने तेच केलं,’ अशी प्रतिक्रिया पेनने दिली.