Marathwada Sathi

सिद्धार्थ मितालीने बांधली सातजन्माची गाठ

पुणे : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर.गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर २४ जानेवारीला या दोघांनी लग्न केलं.गेली तीन वर्ष ते डेट करत होते. अखेर त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाहाचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. आणि त्यांच्या जोडीला चाहत्यांकडून खूप पसंत केले जात आहे. त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

पुण्यातील ढेपेवाडा येथे मोठ्या थाटामाटात ही जोडी विवाहबद्ध झाली.अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.सिद्धार्थ आणि मितालीने लग्नापूर्वीच्या प्रत्येक कार्याचे, विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.लग्नात मितालीने पारंपरिक पद्धतीने नऊवारी साडी, खोपा, दागदागिने परिधान केले होते.सिद्धार्थने देखील रॉयल ब्लू रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केलं होतं. तसंच सोबत शेलादेखील घेतला होता.

Exit mobile version