Marathwada Sathi

श्रुतीच्या विना मेकअप लूकने ; जिंकली फॅन्सची मने

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : नेहमीच सर्व अभिनेत्री आपल्याला मेकअप मध्ये दिसतात. क्वचितच त्यांचे विना मेकअप फोटोज बघायला मिळतात. नुकतेच अभिनेत्री श्रुती मराठे हिने आपला विना मेकअप असलेला फोटो इंस्टाग्राम वर टाकला. या फोटोमध्ये सूर्याची किरणं थेट श्रुतीच्या चेहऱ्यावर आलेली दिसतात.त्यामुळे तिचा चेहरा अजूनच ग्लो करतांना दिसतोय.मेकअप मध्ये ती जितकी सुंदर दिसते,विना मेकअप लूकमध्येही श्रुती तितकीच सुंदर दिसते.त्यामुळे तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कंमेंट्स च्या माध्यमातून आपले प्रेम दर्शविले.

श्रुती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.तीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची सुद्धा चर्चा होत असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत.श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि तिच्या अदा रसिकांना भावल्या आहेत.

श्रुती मराठे चा विना मेकअप फोटो बघण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

https://www.instagram.com/p/CHb9r8lF1DI/?utm_source=ig_web_button_share_sheet

Exit mobile version