Marathwada Sathi

‘नौकरी’ मिळत नाही म्हणून टाकली चहाची ‘टपरी’…!

मराठवाडा साथी न्यूज

राकेश रवळे

बीड : सध्या जगात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे.कोरोनाचा सर्वात मोठा परिणाम हा पदवीधर विध्यार्थ्यांना झालेला लक्ष्यात येतोय.कोरोनामुळे नौकऱ्या मिळत नाही आहेत. अश्यावेळी हलाखीची परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांनी करावे तरी काय ?अनेक विध्यार्थी तर मिळेल ती नौकरी करत आहे.

नौकरी मिळत नाहीये आणि घरची परिस्थिती देखील चांगली नाही.त्यामुळे बीड च्या एका तरुणाने चक्क चहाची टपरी सुरु केली आहे.नितीन मानिक धुताडमल (बीड-दगडी शाहजनपूर)असे या विद्यार्थ्यांचे नाव असून त्याने नुकतीच एम.ए.(समाजशास्त्र)च्या शेवटच्या वर्षाची ऑनलाईन परीक्षा दिली आहे. परीक्षा दिल्यानंतर नौकरी करीता वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न केला मात्र कुठेच नौकरी मिळाली नाही.त्यामुळे शेवटी कंटाळून ‘पदवीधर टी हाऊस’ नावाची टपरी त्याने टाकली आहे.बेरोजगारीमुळे त्याच्या चहाच्या टपरी ला ‘पदवीधर टी हाऊस’असे नाव दिल्याचे नितीन याने सांगितले.

कोरोनामुळे भरपूर ठिकाणी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले,विध्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणात समस्येंना तोंड द्यावे लागत आहे.अश्या स्थितीत शिकून देखील नौकरी मिळत नाही तर शिकून करायचे काय?अशी भावना विध्यार्थ्यांच्या मनात निर्माण होतांना दिसत आहे.

Exit mobile version