Home औरंगाबाद थोरातांच्या फोटोला मारले ‘जोडे’…!

थोरातांच्या फोटोला मारले ‘जोडे’…!

125
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नामांतराचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे.औरंगाबादला संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज(२ डिसें.)‘मराठा ठोक क्रांती मोर्चाकडून’ आक्रमक आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी केली.फक्त एव्हडेच नाही तर ज्यांनी या प्रस्तावाला विरोध केला असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही मराठा आंदोलकांकडून निषेध करण्यात आला.दरम्यान,आंदोलकांनी बाळासाहेब थोरात यांच्या फोटोला जोडे मारत तो फाडण्याचा देखील प्रयत्न केला.या प्रकारानंतर पोलिसांनी ताबडतोब या आंदोलकांना ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here