Marathwada Sathi

धक्कादायक.. शवागरातील फ्रीझर बंद… दोन मृतदेहाचे काय झाले?

नागपूर: कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात तांत्रिक कारणांमुळे शवागरातील फ्रीझर बंद पडले. यावेळी तेथे एक दिवसांपूर्वी रात्री दोन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ठेवले होते. दुसऱ्यादिवशी ती तपासणी होणार होती. दरम्यान दुसऱ्या दिवशी नातेवाईकांना मृतदेहातून दुर्गंधी आल्यावर फ्रिजर बंद असल्याचे कळल्यावर त्यांनी मृतदेहाची विटंबनेचा आरोपकरात तेथे गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता.

प्रकाश किशन मेश्राम (५९) लिहिगाव (ता. कामठी, जि. नागपूर) असे रुग्णाचे नाव आहे. त्याने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. उत्तरीय तपासणी प्रक्रिया मंगळवारी करायची असल्याने मृतदेह शवागरातील फ्रिझरमध्ये ठेवला होता. यावेळी आणखी एक मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ठेवला होता. मध्यरात्री फ्रिझर बंद पडले. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याचे लक्षात येताच मृताच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. मंगळवारी (दि. १४) सकाळी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात घडला. या प्रकारावर तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. नैना दुपारे यांनी फ्रिजर चालू असून त्यात तांत्रिक बिघाड असल्याने कुलिंग होत नसल्याचे लक्षात आल्यावर दुरुस्ती सुरू केली आहे. बुधवारी दुपारपर्यंत दुरुस्ती पूर्ण होणास असल्याचे त्या म्हणाल्या. उत्तरीय तपासणीत शव सुरक्षित असून डी कंपोज झाले नसल्याचाही दावा त्यांनी केला.

Exit mobile version