Marathwada Sathi

धक्कादायक!भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह आई,आजीवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार…!

मराठवाडा साथी न्यूज

नागपूर : भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीसोबत मुलीच्या आई आणि आजीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेने राज्याची उपराजधानीचे शहर नागपूर हादरले असून सर्वत्र खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.या भोंदूबाबाने १७ वर्षीय मुलीवर तू शारीरिक संबंध न केल्यास तुझ्या आई-वडिलांचा मृत्यू होईल,अशी भीती दाखवत २ महिने लैंगिक अत्याचार केला.फक्त एव्हढेच नाही तर धक्कादायक बाब म्हणजे नराधमाने पीडित मुलीच्या कुटुंबातील अजून महिलांवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून ही घटना नागपुरातील पारडी परिसरात घडली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धमेंद्र निनावे उर्फ दुलेवाले असे या भोंदूबाबाचे नाव असून त्याने पीडित तरुणीच्या आई,आजी आणि मामीवरही अत्याचार केला.धक्कादायक म्हणजे भोंदूबाबा हा पीडित तरुणीच्या वडिलांचा मित्र आहे.या प्रकरणी पारडी पोलिसांनी नराधम भोंदूबाबाला अटक केली आहे.

दरम्यान,पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार पूजेच्या बहाण्याने या भोंदूबाबने पीडित मुलीसह आई, मामी आणि आजीवरही चंद्रपूर, डोंगरगड येथे भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने कुकर्म केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.

Exit mobile version