Marathwada Sathi

उर्मिला मातोंडकर यांचा ‘मातोश्री’ वर शिवसेना ‘प्रवेश’…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’ वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. उर्मिला मातोंडकर यांचा भगव्या मास्क ने यावेळी सर्वांचे लक्ष्य वेधले

दरम्यान,पक्षप्रवेशानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले आहे.

Exit mobile version