मराठवाडा साथी न्यूज
कोलंबो : श्रीलंकलेची राजधानी कोलंबोच्या बाहेरील भागात असलेल्या ‘महारा’ जेलमध्ये तुरुंग अधिकारी व एका कैदी मध्ये भांडणात चक्क ८ जणांचा मृत्यू झाला आहे. फक्त एव्हढेच नाही तर या झटापटी दररम्यान जवळपास ५० जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्याचे व एका कैद्यांचे वाद चालू असतांनाच काही कैदी जेलचा दरवाजा तोडून पाळण्याचा प्रयत्न करत होते. ते प्रयत्नात असतांनाच पोलिसांनी केलेल्या कारवाई नंतर हि घटना घडली आहे.
कोलंबोपासून १५ किमी लांब महारा जेल आहे.त्यामध्ये कैद्यांनी दंगा घातला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांना कठोर व्हावे लागले. या घटनेत २ जेलरसह ५० जण जखमी झाले आहेत. जखमींना रागामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. असे पोलीस प्रवक्ते अजित रोहाना यांनी सांगितले आहे.दरम्यान,धक्कादायक बाब म्हणजे महारा जेलमध्ये १७५ कैदी कोरोना पॉसिटीव्ह आढळले आहेत.त्यामुळे कैद्यांनी किचन आणि रेकॉर्ड रूम ला आग लावली.