Marathwada Sathi

धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकलीची बलात्कारानंतर हत्या…!

मराठवाडा साथी न्यूज

हरदोई : उत्तर प्रदेशमधील लहान मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.हरदोईमध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. बुधवारी(२० जाने.)संध्याकाळी बेपत्ता झालेल्या एका सहा वर्षीय चिमुकलीचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आला. मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली.धक्कादायक म्हणजे तिच्या नात्यातील भावानेच तिच्यावर बलात्कार करून त्यानंतर तिचा गळा आवळून तिची हत्या केली.ह्या घटनेनंतर सर्वत्र खळबळजनक आणि संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिहानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून ६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू केला. बाजूच्या गावात राहणाऱ्या नातेवाइकासोबत मुलगी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी यासंदर्भात चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उलगडले.आरोपीने दिलेल्या माहितीनंतर एका ऊसाच्या शेतातून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version