बीड : शिवाजी नगर पोलीसांनी काही प्रवासी वाहतूक करणारे ॲपे रिक्षे ताब्यात घेतले आहे. यात दोन ॲपे रिक्षाचा नंबर एक सारखाच असल्याने याबाबतची चौकशी सुरू आहे.
शिवाजी नगर पोलीसांनी काही ॲपे रिक्षे पकडले. त्यामध्ये एमएच २३/ एक्स ५७१६ आणि याच क्रमांकाचा दुसरा हि रिक्षा ताब्यात घेतलेला आहे. एकाच क्रमांकाचे दोन रिक्षे कसे असा प्रश्न पोलीसांना पडला असून ते याबाबत दोन्ही रिक्षांचे कागदपत्रे पाहून या कागदपत्रांची चौकशी करत आहेत. वाहतूक पोलीस कर्मचारी मच्छिंद्र कप्पेे यांनी हे दोन्ही रिक्षे पकडून शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये जमा केलेले आहे.