Home मराठवाडा आत्महत्येच्या घटनेबद्दल शिवसेनेनं तीव्र दु:ख व्यक्त केलं..

आत्महत्येच्या घटनेबद्दल शिवसेनेनं तीव्र दु:ख व्यक्त केलं..

344
0


मराठवाडासाथी न्यूज
मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येच्या घटनेबद्दल शिवसेनेनं तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ‘केवळ आमटे कुटुंबासाठीच नाही, तर अवघ्या महाराष्ट्रासाठी ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हजारो कुटुंबांच्या जीवनात ‘आनंदवन’ फुलविणाऱ्या, त्यांच्या जखमा भरून काढणाऱ्या आमटे कुटुंबातच हे अघटित का घडावे?,’ अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे.आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ व ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांनी काल विषारी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केली. नैराश्येतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. मात्र, या घटनेनं राज्यातील सामाजिक वर्तुळ हादरून गेलं आहे. शिवसेनेनंही ‘सामना’च्या अग्रलेखातून या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ‘हे संकट पेलण्याची ताकद परमेश्वर आमटे कुटुंबाला देवो,’ अशी प्रार्थनाही शिवसेनेनं केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here