Marathwada Sathi

शिवसेना ‘भडकली’..!

मराठवाडा साथी न्यूज

अहमदनगर : शिर्डी देवस्थानकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या ड्रेसकोडसंबंधी एक फलक लावण्यात आला होता. या निर्णयाच्या फलकाविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या.याप्रकरणात शिवसेनेच्या महिला संघटक स्वाती परदेसी यांनी तृप्ती देसाई यांना एक इशारा दिला आहे. “तृप्ती देसाई शिर्डीत यायलाच हव्या. त्यांना इथे आल्यावर कळेल की त्यांनी संस्थानावर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. त्या इथे आल्या की त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही नक्कीच राहणार नाही. तसंच, दरवेळी मंदिरात जे काही स्टंट त्या करत असतात, त्यांचे ते सगळे स्टंट आम्ही आज बंद करू”, असा इशारा परदेसी यांनी दिला.

काय आहे प्रकरण

शिर्डीमधील साई मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version