Home औरंगाबाद शिरीष बोराळकरांचा विजय निक्ष्चित : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिरीष बोराळकरांचा विजय निक्ष्चित : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

552
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : बेईमानीने सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार शेतकरी, कामगार, गरिबांचे अश्रू पुसण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मराठवाडा पदवीधर निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवाराचा म्हणजेच शिरिष बोराळकरांचा विजय निश्चित असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, पदवीधर उमेदवार शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष संजय केणेकर, विजय औताडे, प्रवीण घुगे आदींची उपस्थिती होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारच्या काळात मराठवाड्याला मोठा निधी दिला होता. १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, मराठवाडा ग्रीड प्रकल्प यासह कोकणात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली होती. मात्र महा विकास आघाडी सरकारने हे सर्व मोठे प्रकल्प थंड बस्त्यात टाकले आहेत. सरकार मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे. त्यामुळे शेतकरी, कामगार, गोरगरीब त्रस्त आहेत. कोरोनाच्या काळात छोट्या राज्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला. मात्र महाराष्ट्र सरकारने थोडीशी मदत सर्वसामान्यांना केली नाही. फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचे काम हे सरकार करीत असल्याची टीका त्यांनी केली.

वीज बिल माफ करून कोट्यवधी नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. मात्र सरकार निर्णय घेत नाही. ऊर्जामंत्री अभ्यास नसल्याचे वक्तव्य करतात हे निराशाजनक असल्याचेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here