Home क्रीडा फोटोमुळे अडचणीत आला शिखर धवन…!

फोटोमुळे अडचणीत आला शिखर धवन…!

197
0

मराठवाडा साथी न्यूज

वाराणसी : टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन सध्या एका फोटोमुळे अडचणीत आला आहे. बोटीमध्ये बसलेला शिखर धवन पक्षांना दाणे देतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.१९ जाने.ला शिखर वाराणसीला गेला.त्यादरम्यान,एका बोटीमध्ये बसून शिखर पक्षांना खायला देत होता.दरम्यान,याप्रकरणी पोलिसांनी नाविक प्रदीप साहनी याच्यावर तीन दिवस बोट चालवायला पोलिसांनी बंदी घातली आहे.

दरम्यान,सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाने पक्षांना दाणे खायला देण्यावर बंदी घातली आहे.मात्र,शिखर धवनचा हा फोटो व्हायरल झाल्यामुळे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी चौकशीला सुरूवात केली.या चौकशीनंतर नाविकावर कारवाई करण्यात आली. शिखर धवन यानेच इन्स्टाग्रामवरून हा फोटो शेअर केला.या फोटोला कॅप्शन देत पक्षांना खायला देण्यात आनंद मिळतो,असे शिखरने लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CKVzFwFASot/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here