Home देश-विदेश एकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म !

एकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म !

10270
0

माली: मोरक्कोमध्ये एका महिलेने ९ अपत्यांना जन्म दिला असल्याचे वृत्त आहे. ही महिला मूळची माली देशाची नागरिक आहे. माली सरकारने याबाबतचे एक वक्तव्य जारी केले असून प्रसुती झालेली महिला आणि अपत्ये यांची प्रकृती चांगली आहे. याआधी माली सरकारने २५ वर्षीय हलीमा सिस्से हिला चांगल्या उपचारासाठी ३० मार्च मोरक्कोला पाठवले होते. या महिलेच्या गर्भात सात भ्रूण असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तिने ९ अपत्यांना जन्म दिला.
मालीच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हलीमाने पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला आहे. सिजेरियन द्वारे तिची प्रसुती झाली. देशाच्या आरोग्य मंत्री फांता सिबी यांनी सांगितले की, आई आणि नवजात बालके पूर्णपणे सुखरूप असून त्यांची प्रकृती चांगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here