Home मनोरंजन … या दिवशी प्रदर्शित होणार शाहिदचा “जर्सी “

… या दिवशी प्रदर्शित होणार शाहिदचा “जर्सी “

378
0

मुंबई : कबीर सिंग या चित्रपटानंतर मात्र शाहिद कपूर लवकरच “जर्सी ” या चित्रपटात दिसणार आहे. त्याने या चित्रपटाची प्रदर्शन तारीख आपल्या सोशल मीडियावर सांगितली आहे.जर्सी हा तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. शाहिद या चित्रपटामध्ये एका क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. मार्चमध्ये कोरोनाव्हायरस साथीच्या आजारात शूटिंग थांबविण्यात आले होते. अनलॉक नंतर चित्रपटाला पुन्हा सुरुवात करण्यात अली.

हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. शाहिदने जर्सी लुकचा फोटो शेअर करत लिहिले आहे , ‘ सिनेमा दिवाळीला 5 नोव्हेंबर 2021 रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होईल. हा आत्म्याचा विजय आहे. या प्रवासाचा मला अभिमान आहे. सर्व टीमला समर्पित!’काही दिवसांपूर्वी ‘जर्सी’चे शूटिंग संपल्याचे शाहिदने सांगितले होते. ऐन कोरोना काळात हे शूटिंग झाले होते. ‘कोरोना काळात 47 दिवस शूटिंग करणं कठीण होतं. पण मला माझ्या टीमचा अभिमान आहे. हे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हते. जे रोज जीव धोक्यात घालून सेटवर येत होते, त्या सर्वांचे मी आभार मानतो. ‘जर्सी’ची कहाणी प्रेरणादायी आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here