Marathwada Sathi

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्याच्या खेळाडूचे लैंगिक शोषण…

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली: दक्षिण कोरियाच्या एका माजी प्रशिक्षकाला महिला खेळाडूचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माजी स्पीड स्केटिंग प्रशिक्षक चो जे-बीओमने २०१८ सालच्या ऑलिंपिकपदक विजेच्या शिम सुक-ही हिचे लौंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
कोरियाच्या या कोचने संबंधित महिला खेळाडूचे शारीरीक शोषण केल्याचे मान्य केले. जगभरात जेव्हा अनेक महिला मी टू आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्यावर झालेल्या लौंगिक शोषणाचे आरोप सांगत होत्या. तेव्हा दक्षिण कोरियाच्या या पदक विजेत्या खेळाडूने कोचने केलेले कृत्य जगासमोर आणले होते.
शिमनेचे शोषण २०१४ सालापासून करण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे तेव्हा ती एक विद्यार्थी होती आणि प्योंगचांग ऑलिंपिकच्या काही आठवडे आधी कोचने तिचे शारीरीक शोषण केले. शिमने केलेले आरोप प्रथम कोचने नाकारले होते. कोच चो जे-बीओमने शिमला वारंवार मारहाण केले होते.
ऑलिंपिकमध्ये शॉर्ट-ट्रॅक स्पीड स्केटिंग प्रकारात सुवर्णपदक मिळवणाऱ्या शिमने या सर्व घटनांचा खुलासा २०१८ साली केला होता. शिमने केलेल्या आरोपामध्ये एकदा कोचने हॉकी स्टिकने मारहाण करून बोट मोडल्याचे म्हटले होते.या प्रकरणी डिसेंबर २०१८ साली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने कोचला १० वर्षाची शिक्षा सुनावली. त्याच बरोबर सात वर्ष लहान मुले आणि युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यापासून बंदी घातली आहे.

Exit mobile version