Marathwada Sathi

सीरिअल किलर गजाआड…!

मराठवाडा साथी न्यूज

हैद्राबाद : हैद्राबाद येथील टास्क फोर्सच्या टीमने एका १६ महिलांचा खून करणाऱ्या सीरियल किलरला ताब्यात घेतले आहे.ताडीच्या दुकानात येणाऱ्या महिलांना हा आरोपी लक्ष बनवित होता.आरोपी एम रामल्लू याला महिलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याला आतापर्यंत २१ वेळा अटक करण्यात आली असून यापैकी १६ या हत्येच्या केसेस त्याशिवायप्रकरणात त्याच्यावर चोरीचा आरोप आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामल्लू(वय ४५)बोराबंदा येथील मजुराचे काम करतो.त्याला नॉर्थ झोन टास्क फोर्सच्या टीमने ३० डिसें. रोजी ५० वर्षीय वेंकटम यांच्या हत्येच्या आरोपाखाली आणि मुलुगूमधील बालंगूर येथे १० डिसें.मध्ये एका अनोखळी महिलेच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हैद्राबाद पोलीस कमिश्नर अंजनी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सीरियल किलर रामल्लू हा ताडीच्या दुकानात येणाऱ्या महिलांना लक्ष करीत होता. ताडीच्या दुकानात येणाऱ्या महिलांची हत्या केल्यानंतर तो त्यांच्याकडील दागिने वा पैसे चोरी करीत होता.

दरम्यान,पहिल्या केसमध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याच हैद्राबादमधील अनकुशापूर येथे हातात एक कागद आणि गळ्याभोवती साडीचा फास असलेला आणि अर्धवट जळलेला अनोळखी मृतदेह सापडला होता. त्यानंतर याचा शोध सुरू झाला. त्या महिलेच्या हातातील पेपरवर एक मोबाइल क्रमांक होता. त्याला फोन करुन यापुढील माहिती जमा करण्यात आली. मोबाइल क्रमांक असलेल्या व्यक्तीचा या हत्येशी काहीही संबंध नव्हता, मात्र याच्या मदतीने सीरियल किलरपर्यंत पोहोचता आल्याचे पोलीस कमिश्नरांनी सांगितले आहे.त्यानंतर हैद्राबाद टास्क फोर्सने सापळा रचून मंगळवारी आरोपीला अटक केले आहे.

दरम्यान,या आरोपीने चक्क १६ महिलांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Exit mobile version