Marathwada Sathi

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचे निधन…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे आज(२ जाने.)वयाच्या ८६ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.बुटा सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री इत्यादी पदे भूषवितानाच बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपदही सांभाळले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.आजच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

दरम्यान,बुटा सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version