Marathwada Sathi

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सोनिया गांधी यांचे विश्वासू अहमद पटेल यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे.अहमद पटेल यांना सध्याच्या काँग्रेस चे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जात असे. त्यांचे वय ७१ वर्षांचे होते. ऑक्टोबरला ‘कोरोना’ ची लागण झाल्याचे त्यांनी स्वतः ट्विटरवरून कळविले होते. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. अहमद पटेल यांना ‘मेट्रो‘ रुग्णालयातून गुरुग्राममधील ‘मेदांता’ रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करुन अहमद यांच्या निधनाची माहिती दिली.दरम्यान ,पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद,राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

अहमद पटेल यांच्या विषयी थोडक्यात

अहमद पटेल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसचे पंचायत तालुका अध्यक्ष म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनीवेळा ‘लोकसभा’ आणिवेळा ‘राज्यसभेवर’ सदस्य म्हणून काम पहिले.त्यांचे व्यक्तिमत्व लो प्रोफाईलचे होते. २००४ -२०१४ या काळात काँग्रेस पक्ष सत्तेत असतांना पटेल यांची राजकीय ताकद सर्वांनीच अनुभवली होती. तसेच सोनिया गांधी यांचे सल्लागार म्हणून आपली छाप पाडत काँग्रेसमध्ये त्यांनी आपले नेतृत्व प्रस्थपित केले होते.काँग्रेसची संघटनाच नाही तर राज्यांपासून केंद्रापर्यंत स्थापन होणाऱ्या सरकारांमध्ये काँग्रेस नेत्यांचे भवितव्य हे अहमद पटेल निश्चित करीत असत.

अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल याने केलेले ट्विट : त्याने आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे की ,’आपणास कळविताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज २५ मे रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अल्लाह त्यांना जन्नत नसीब करे’. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अंत्यदर्शनसाठी गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद,राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी अहमद पटेल निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

Exit mobile version