Marathwada Sathi

औरंगाबाद मनपाचा वरिष्ठ लिपिक लाचेच्या जाळ्यात

औरंगाबाद : घराच्या मालमत्ता कराची पुनर्रचना न करण्यासाठी दहा हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या महापालिकेच्या वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने अटक केली. हि कारवाई मनपाच्या सेंट्रल नाका वार्ड कार्यालयात करण्यात आली. सोहेल पठाण फेज अहेमद पठाण (५२, रा. नवाबपुरा) असे अटकेतील मनपाच्या लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार यांचे अलिमनगर भागात घर आहे. त्या घरावरील मालमत्ता कराची पुनर्रचना न करणासाठी मनपाच्या सेंट्रल नाका कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सोहेल पठाण याने १६ डिसेंबर रोजी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने यासंबंधी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली तेव्हा संशय आल्याने पठाण याने रक्कम स्वीकारली नाही मात्र, लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने एसीबीच्या पथकाने त्याला मंगळवारी (दि. २२ फेब्रुवारी ) अटक केली. याप्रकरणी जीन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हि कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक मारोती पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रेश्मा सौदागर, पोलीस नाईक भिमराज जीवडे, रवींद्र काळे, विनोद आघाव, अशोक नागरगोजे, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.

Exit mobile version