Home बीड ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्राच्या परिसरात कलम 144(2) लागू – जिल्हाधिकारी राहूल रेखावार

ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्राच्या परिसरात कलम 144(2) लागू – जिल्हाधिकारी राहूल रेखावार

167
0

बीड
राज्यात एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणा-या आणि नव्याने स्थापित झालेल्या एकूण 14,234 ग्रापमपंचायतीच्या सार्वजनिक निवडणूकांकरिता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम निश्चित करुन दिलेल्या बीड जिल्हयातील 129 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्याची मतदान प्रक्रिया दि. 15 जानेवारी 2021 रोजी होणार असून सदर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी जिल्हयातील सर्व मतदान केद्राच्या 200 मिटर परिसरात फौ.प्र.सं. 1973 चे कलम 144 (2) कलम सदर मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू करण्यात आले आहे.
हे आदेश निवडणूकीच्या कामकाजासाठी या काळात शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यानां लागू राहणार नाही. मतदान केद्रांच्या परिसरात नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना वगळून पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जे मतदार मतदानासाठी रांगेत संबंधित मतदान केद्रांवर उभे असतील त्यांना हे लागू राहणार नाही. मतदान केंद्राच्या परिसरात ध्वनिक्षेपक वापरास, वाद्य वाजविण्यास, मिरवणूका काढणे यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. शासकीय वाहना व्यतिरिक्त इतर अनाधिकृत वाहनांना 200 मीटर परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात येत आला आहे. हे आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम,मयताची अंत्ययात्र यांना लागू राहणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here