Marathwada Sathi

पुण्यातील शाळा १३ डिसेंबर पर्यंत बंदच…!

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : मुंबई आणि ठाण्यानंतर आता पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत शाळा ‘बंद’ ठेवण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. खासगी शाळांनाही हा निर्णय लागू असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. २३ नोव्हेंबर पासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यात येणार आहे. मात्र सद्धस्थितीचा आढावे घेत पालकांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान १३ डिसेंबरला परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

Exit mobile version