Marathwada Sathi

SBI वरपरकर्त्यांनचा खिशाला झळ” SBI चे क्रेडिट कार्डचा शुल्कत वाढ

एसबीआयच्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा झटका बसणार आहे. तुम्ही ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरत असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डधारकांना आता मोठा झटका बसणार आहे. SBI ने क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट करण्यावर प्रोसेसिंग फी वाढवली आहे. SBI ने आपल्या ग्राहकांना एक मेसेज पाठवला. त्यात क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरण्यासाठी 199 रुपये कर भरावा लागणार असल्याचं स्पष्ट केल.
आतापर्यंत, ग्राहक क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरण्यासाठी 99 रुपये कर भरत आहेत, परंतु आता ग्राहकांना 199 रुपये कर भरावा लागणार आहे. SBI बँकेने केलेला हा नवा बदल 15 मार्च 2023 पासून लागू होईल. SBI ने नोव्हेंबर 2022 मध्ये यासाठी 99 रुपये कर असे शुल्क लागू केले होते. पण आता या करामध्ये अचानक वाढ करण्यात आली आहेत.

Exit mobile version