Home Uncategorized औरंगाबादेत शनिवारी-रविवारी संपूर्ण लॉकडाऊन ; अन्यथा मोठ्या लॉकडाऊनकडे वाटचाल, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

औरंगाबादेत शनिवारी-रविवारी संपूर्ण लॉकडाऊन ; अन्यथा मोठ्या लॉकडाऊनकडे वाटचाल, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

2079
0

औरंगाबाद : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता येत्या 11 मार्चपासून औरंगाबादेत अंशत: लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादच्या लॉकडाऊनबाबत आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पंदेउया, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, आरोग्य अधिकारी पाडळकर, डीसीपी निकेश खाटमोडे पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.  
15 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमध्ये येत्या 11 मार्च रात्री १२ वाजेपासून अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे.

काय सुरु, काय बंद?

या लॉकडाऊन मध्ये राजकीय, सामाजिक सभा, आठवडी बाजार, आंदोलने, मोर्चे कार्यक्रम यावर पुर्णतः बंदी असेल, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, बंद असणार आहे.  तसेच शहरातील मंगलकार्यालय बंद राहणार आहे. शहरातील मॉल देखील बंद राहणार आहे. शहरातील हॉटेल, बार, परमिट रूम, रेस्टोरंट एकूण क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत रात्री 9 पर्यंत हॉटेल सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतर हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे. पण रात्री 11 पर्यंत होम डिलिव्हरी सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच ग्रंथालयही अर्ध्या क्षमतेने सुरु राहणार आहेत.

मात्र शनिवार रविवारी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या दिवशी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. मात्र यानंतर जर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर मात्र औरंगाबादमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

या दरम्यान धार्मिक, राजकीक, आंदोलने, मोर्चे कार्यक्रम यावर पुर्णतः बंदी असेल. तसेच शहरातील आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शहरातील शाळा, महाविद्यालय, क्लासेस, बंद राहतील मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहील तसेच नियोजित परीक्षा घेण्यात येईल. शहरातील मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल मधील लग्न बंद, पुर्णतः बंद असतील. शहरातील हॉटेल, बार, परमिट रूम, बार आदी रात्री ९ पर्यंतच ५० टक्के क्षमतेने, सुरु राहतील. तसेच होम डिलिव्हरी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील.

यावेळी वैद्यकीय सेवा, दूध, भाजीपाला, गॅस, पेट्रोल पंप, उद्योग, मीडिया, बँक, पशुखाद्य, अंडी मटण, वाहतूक, औद्योगिक परिसर, शहरातील दुकाने कोरोनाचे नियम पाळत सुरु राहणार आहे. परंतु सर्व व्यापाऱ्यांची दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक राहणार आहे.खाजगी आणि सरकारी कार्यालये सुरु राहणार आहे.

जाधववाडी येथील भाजी मंडीची वाढती गर्दी पाहता बुधवार (७) रात्री पासून पुढील सात दिवस औरंगाबाद बाजार समिती जाधववाडी बंद करण्यात येणार आहे  तर पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.  
 
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, आता नियम पाळले तर छोट्या लॉकडाऊन मध्येच भागेल नसता मोठ्या लॉकडाऊन कडे वाटचाल करावी लागेल. या लॉकडाउनच्या काळात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन हे सर्व विभाग सोबत काम करून कोविडला थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच कोरोना वॅक्सिन सर्वांनी घेण्याचे आवाहन ही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here